जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितावर गोळीबार; शोधकार्य सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian army
जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितावर गोळीबार; शोधकार्य सुरु

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितावर गोळीबार; शोधकार्य सुरु

शोपियां : काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावरील 'द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु असतानाच सोमवारी शोपियांमधील एका काश्मीरी पंडितावर दहशतवाद्यांना गोळीबार केला. या घटनेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यामुळं त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षकांकडून शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे. (Jammu and Kashmir Terrorist firing on Kashmiri Pandit Search Operation begins)

प्राथमिक चौकशीतून माहिती समोर आली की, दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या काश्मीरी पंडिताचं नाव बाळकृष्णन असं असून त्याच्या चौटिगाम शोपियां येथील घराजवळच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या गोळीबारात त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

हेही वाचा: अत्यावश्यक औषधांच्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण नाही; आरोग्य मंत्र्यांचं स्पष्टीकरण

शोपियांमधील या घटनेपूर्वी श्रीनगरमधील लाल चौकात दिवसाढवळ्या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला चढवला. यामध्ये एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला तर आणखी एक जण जखमी झाला आहे. तर आणखी एका घटनेमध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये सीमारेषेवर घुसखोरांना रोखण्यात यश मिळवलं. यामध्ये एका घुसखोराला ठार मारण्यात सैन्याला यश आलं. या दहशतवाद्याकडून हत्यारं आणि जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडून काश्मिरी पंडीत आणि सीआरपीएफच्या जवानावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. शहीद जवान विशाल कुमार यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. तसेच जखमी जवानाला त्वरीत बरं होण्यासाठी प्रार्थना करतो असं राज्यपालांनी म्हटलं आहे. आपले जवान दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Jammu And Kashmir Terrorist Firing On Kashmiri Pandit Search Operation Begins

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..