esakal | Jammu: काश्मीमधील हिंसेला केंद्र सरकार जबाबदार : रजनी पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसच्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील

काश्मीमधील हिंसेला केंद्र सरकार जबाबदार : रजनी पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काश्मीर खोरे पुन्हा अशांत होऊ लागले असून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचे केलेले हत्याकांड मन विषण्ण करणारे आहे. ३७० कलम हटविल्यानंतर सारे काही सुरळीत असल्याचा दावा करणारे केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनच या हिंसेला जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसच्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांनी आज केला.

रजनी यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या मख्खनलाल बिंद्रू आणि शिक्षिका सुपेंद्र कौर यांच्या कुटुंबीयांची श्रीनगरमध्ये, तर दिवंगत शिक्षक दीपकचंद यांच्या कुटुंबीयांची जम्मू येथे नुकतीच भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी दिल्लीत येऊन त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

त्या म्हणाल्या, की आतापर्यंत शिक्षकांवर हल्ले झाले नव्हते. यामागे विशिष्ट हेतू आहेत. याची नेमकी कारणे शोधावी लागतील. मात्र, ३७० कलम हटविल्यानंतर सारे काही सुरळीत झाल्याचे दावे केंद्राकडून केले जात होते. असे असताना काश्मीरमध्ये भयाचे वातावरण निर्माण होणे, लोकांच्या मनात स्थलांतराची भावना निर्माण होणे हे केंद्र सरकारचे, गृह मंत्रालयाचे अपयश आहे.

लखीमपूर खिरीला जाणारे राहुल गांधी, प्रियांका गांधी काश्मीरला का गेले नाहीत या भाजपच्या आक्षेपाचाही रजनी पाटील यांनी समाचार घेतला. आपले भेटणे हे राहुल यांच्या आदेशानुसारच होते. पक्षाच्या कार्यक्रमासाठी भुवनेश्वरमध्ये असताना राहुल यांनी आपल्याला फोन करून काश्मीरला जाण्यास सांगितले होते. जम्मू काश्मीरच्या प्रभारी म्हणून काँग्रेसच्या प्रतिनिधी या नात्याने मी पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. काश्मीरमध्ये हिंसा होत असताना अमित शाह हे गरबा खेळत होते. त्यांना हा प्रश्न का विचारला जात नाही, असा सवालही रजनी यांनी केला.

loading image
go to top