
श्रीनगर : देशाचे नंदनवन जम्मू काश्मीरला यंदा पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे. यंदा तुलनेने कमी पाऊस पडल्याने शुष्क भागात आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. श्रीनगर, जम्मूसह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसत असून मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यात पाणीटंचाईचे संकट असल्याचे सांगत त्यावर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाच्य विविध उपायांचा आढावा घेतला जात असल्याचे नमूद केले.