esakal | Jammu Kashmir: दुफळीने देशाचे अस्तित्व धोक्यात : फारुख
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. फारुख अब्दुल्ला

दुफळीने देशाचे अस्तित्व धोक्यात : फारुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : ‘‘देश जातींमध्ये विभागला जात असल्याने संपूर्ण भारतात एक प्रकारचा असंतोष खदखदत आहे. जर हे थांबले नाही तर देशाचे अस्तित्व टिकणार नाही,’’ असे विधान जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी केले.

गेल्या आठवड्यात श्रीनगरमधील शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मुख्याध्यापिका सुपिंदर कौर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अब्दुल्ला म्हणाले ‘‘देशात असंतोषाचे वादळ खदखदत आहे. हिंदू, शिख व मुस्लिम यांच्यात फूट पाडली जात आहे. जर हे थांबले नाही तर देशाचे अस्तित्व धोक्यात येईल.’’ मुस्लिम, शीख व पंडितांनी एकत्र येऊन हल्लेखोरांविरोधात एकत्र लढा उभारला पाहिजे. आपल्या शत्रूशी एकत्रपणे लढायला हवे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही.’’

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते देवेंद्र राणा, सुरजितसिंह स्लाथिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यावर विचारले असता ‘नेत्यांनी पक्ष सोडण्यासारख्या घटना राजकारणात घडतच असतात. यात काही वेगळे नाही,’ अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी दिली.

काश्मिरींमध्ये असुरक्षिततेची भावना

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नवी दिल्लीत ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत काश्‍मीरमधील वाढत्या हत्येंच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्याचे सांगत धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना सुरक्षित वातावरण पुरविण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत यंदा २८ निरपराधांचा बळी गेला. यात विविध धर्मांच्या नागरिकांचा समावेश आहे. अल्पसंख्याकांवर नव्याने हल्ले होऊ नयेत, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे अब्दुल्ला म्हणाले.

loading image
go to top