

Security forces launch a major anti-terror operation in Jammu and Kashmir following the November 11 CRPF camp attack, with Lashkar-e-Taiba commander Latif Bhat reportedly surrounded
esakal
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात पोलीस आणि सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट सुरक्षा दलांच्या कचाट्यात सापडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ११ नोव्हेंबर रोजी अखरान गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर झालेल्या हल्ल्यामागे लतीफ भट आणि त्याचे साथीदार असल्याचा संशय आहे.