जम्मू-काश्मीर: बुरखाधारी व्यक्तीचा CRPF कॅम्पवर हल्ला; पेट्रोल बॉम्ब टाकून पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जम्मू-काश्मीर: बुरखाधारी व्यक्तीचा CRPF कॅम्पवर हल्ला; पेट्रोल बॉम्ब टाकून पसार

जम्मू-काश्मीर: बुरखाधारी व्यक्तीचा CRPF कॅम्पवर हल्ला; पेट्रोल बॉम्ब टाकून पसार

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. तिथे दर दोन दिवसाला काही ना काही दहशतवादी घडामोड घडताना दिसते. त्याच पार्श्वभूमीवर काल मंगळवारी संध्याकाळी एका दहशतवाद्याने सीआरपीएफ कॅम्पवर (CRPF camp) बॉम्ब फेकून हल्ला केला आहे. त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. (Jammu and Kashmir) या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Petrol Diesel Price: डिझेलही शंभरी पार! जाणून घ्या पेट्रोलचे आजचे दर

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातील सीआरपीएफ कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकून घातपात करायचा प्रयत्न केला. त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. लवकरच तिला अटक केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात पॉझिटीव्ह वातावरण, आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

उपलब्ध झालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये दोन पादचारी रस्ते दिसतात आणि दुचाकी वाहने जात असलेला रस्ताही दिसतो. पुढे यामध्ये बुरखा घातलेली एक व्यक्ती येते आणि रस्त्याच्या मधोमध थांबते. कोणतीतरी एखादी वस्तू ती आणलेल्या पिशवीतून बाहेर काढत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर ती व्यक्ती तो बॉम्ब फेकते आणि लगेच घटनास्थळावरून पळून जाते. या घटनेमुळे हैराण नागरिकही तिथून पळ काढताना दिसतात. या पेट्रोल बॉम्बमुळे लागलेली आग विझवण्यासाठी काही जण पाण्याच्या बादल्या आणताना दिसत आहेत.

Web Title: Jammu Kashmir Terrorist Attack Veiled Person Hurls Petrol Bomb At Crpf Camp In J And K Sopore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..