
जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. झिनपाथर केलर भागात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तयबाच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन दहशतवादी अजूनही या भागात अडकले असून, सुरक्षा दलांनी त्यांना घेरले आहे. ही कारवाई दहशतवादमुक्त काश्मीरच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.