SIT Investigation : जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील बुधाल गावात गूढ मृत्यूसत्रामुळे अस्वस्थता पसरली आहे. दीड महिन्यांत पंधराच्या आसपास मृत्यू झाले असून, तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
जम्मू : गेल्या दीड महिन्यांपासून राजौरी जिल्ह्यात बुधाल गावात होणाऱ्या गूढ मृत्यूने चिंता वाढलेली असताना काल आणखी एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. गेल्या दीड महिन्यांत गूढरित्या मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पंधरावर पोचली.