

marine drive accident
esakal
जमशेदपूर: जमशेदपूरमधील दोमुहानी मरीन ड्राईव्हवर झालेल्या भीषण रस्ते अपघातात झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. सोनारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.