‘पुन्हा चूक होणार नाही, राष्ट्रीय महिला आयोगासमोर दिला लेखी माफीनामा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jawed Habib

"पुन्हा चूक होणार नाही"; अखेर जावेद हबीबचा माफीनामा

हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब (Javed Habib) यांना मंगळवारी राष्ट्रीय महिला आयोगासमोर (National Commission for Women) हजर राहून माफी मागावी लागली. हबीब यांनी एका महिलेचे केस कापताना डोक्यावर थुंकल्याबद्दल लेखी माफीनामा दिला आहे. कोणालाही दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. एनसीडब्ल्यूने ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांनी हबीबला असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे.

एनसीडब्ल्यूमध्ये आज जावेद हबीबवर (Javed Habib) सुनावणी झाली. हबीब हे एनसीडब्ल्यूसमोर हजर झाले आणि माझा कोणालाही दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतू नव्हता असे म्हणत लेखी माफी मागितली. दुसऱ्या ट्विटमध्ये एनसीडब्ल्यूने म्हटले आहे की त्यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्यास सांगितले होते.

हेही वाचा: महिनाभराने कामावर रूजू झालेल्या डॉक्टरचा खून; झाडल्या चार गोळ्या

व्हिडिओ झाला होता व्हायरल

व्हिडिओमध्ये हबीब हे महिलेच्या केसांवर थुंकताना दिसत होते. व्हिडिओमध्ये हबीब (Javed Habib) पाण्याची कमतरता असेल तर थुंकी वापरा असे म्हणतानाही ऐकू येत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये लोक हसताना आणि टाळ्या वाजवताना ऐकू येत आहेत. ही घटना मुझफ्फरनगरमध्ये घडली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top