जवाहरलाल नेहरू होते 'गुन्हेगार'

वृत्तसंस्था
Sunday, 11 August 2019

जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सुरू झालेले राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही.

भुवनेश्वर : जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सुरू झालेले राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कलम 370 वरून कॉंग्रेसवर टीका करताना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे "गुन्हेगार' होते, असे वक्तव्य केले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवराजसिंह यांनी नेहरूंना "गुन्हेगार'ची उपमा दिली. ते म्हणाले. पहिले कारण म्हणजे, जेव्हा भारतीय फौजांनी काश्‍मीरमधून पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडत आगेकूच केली होती. नेमके त्याच वेळी नेहरूंनी शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळे काश्‍मीरचा एक तृतीयांश हिस्सा पाकिस्तानच्या कब्जामध्ये गेला. जर आणखी काही दिवस त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली नसती, तर संपूर्ण काश्‍मीर भारताचा हिस्सा असला असता. 

"नेहरूंनी जम्मू-काश्‍मीरमध्ये कलम 370 लागू केले. एक देशात दोन चिन्ह, दोन घटना आणि दोन पंतप्रधान कसे अस्तित्वात राहू शकतात. हा देशावर अन्यायच नव्हे तर अपराध आहे,'' असा आरोपही शिवराजसिंह यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jawaharlal Nehru was criminal says Shivraj Singh Chouhan