जवानांनी धरला गरब्यावर ठेका; आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडिओ

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

जवानांचा हा व्हिडिओ दीप्ती चारोलकर नावाच्या एका महिलेने शेअर केला आहे. महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटला रिट्विट केले.

नवी दिल्ली : देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने तरुण-तरुणींसह अनेक जण गरब्यावर ठेका धरत आहेत. या गरब्याचा मोह सीमेवर तैनात असलेल्या जवानांनाही आवरता आला नाही. जवानांच्या एका तुकडीने हा ठेका धरला आहे. याचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सणासूदीला अत्यंत आनंद असतो. प्रत्येकजण उत्साहात असतो. तसेच आता नवरात्रौत्सवानिमित्त घरात गोड पदार्थ, मिठाई दिली जाते. गरबाही खेळला जातो. मात्र, सीमेवर तैनात असलेल्या जवानांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती आणि सोशल मीडियावर सातत्याने एक्टिव्ह असलेले आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ रिट्विट करत शेअर केला आहे. 

दरम्यान, जवानांचा हा व्हिडिओ दीप्ती चारोलकर नावाच्या एका महिलेने शेअर केला आहे. महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटला रिट्विट केले.

हजारो लाईक्स

13 जवानांची टीम गरबा डान्स करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट केले. त्यानंतर त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jawans celebrated Navratri Festival