

Congress Leader Jayram Ramesh Questions Centre Over Rising Food Prices as Pulses Oil Spices and Onions Become Costlier
sakal
नवी दिल्ली : खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्या महिनाभरात मसाले, डाळी आणि खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. महागाईमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरील आर्थिक भार वाढत असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.