"काँग्रेसने हिंदूंवर केलेल्या अन्यायाबद्दल त्यांना शिक्षित करण्यासाठी भाजप राज्यव्यापी जनजागृती सुरू करेल. मुस्लिम आरक्षण हे संविधानाच्या विरुद्ध आहे."
बंगळूर : सरकारी निविदांमध्ये मुस्लिमांसाठी ४ टक्के आरक्षणाविरुद्धच्या (Muslim Reservation) लढाईत मित्रपक्ष धजद (JDS) भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही, असे चित्र आहे. शनिवारी बंगळूर येथे झालेल्या प्रादेशिक पक्षाच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली.