
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे.
माजी पंतप्रधानांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधींकडं मागितला पाठिंबा
बंगळुरु : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. त्याच दिवशी कर्नाटकात मतदान (Karnataka Rajya Sabha Election) होणार आहे. जनता दलनं (एस) उर्वरित एका जागेसाठी डी. कुपेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिलीय. मात्र, स्वबळावर जिंकण्यासाठी पक्षाकडं संख्याबळ नाहीय. त्यामुळं पक्षाचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडं संपर्क साधून पाठिंबा मागितलाय. मंगळवारी जेडी (एस) नेत्यांनी ही माहिती दिलीय.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सीएम इब्राहिम आणि माजी मंत्री एचडी रेवन्ना यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं की, काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांकडून विश्वास मिळाल्यानंतरच रेड्डी यांना मैदानात उतरवण्यात आलंय. काँग्रेसनं सोमवारी मन्सूर अली खान यांना पुरेशी मतं न मिळाल्यानं त्यांचा दुसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलंय. खान यांना उमेदवारी देऊन काँग्रेसला हे दाखवायचं होतं की JD(S) नं आपली धर्मनिरपेक्ष ओळख सिद्ध करावी.
हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत : शिवराज सिंह चौहान
तथापि, 'जेडीएसनं आता पुन्हा काँग्रेसवर आरोप केलाय की, जर काँग्रेसला जातीयवादी शक्तींना रोखण्यात खरोखरच रस असेल तर ते त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत.' देवेगौडा यांनी यापूर्वी सोनिया गांधींना पाठिंबा देण्याची विनंती केलीय. त्याचवेळी कुमारस्वामींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. शिवाय, जेडी (एस) नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे, डीके शिवकुमार, आरव्ही देशपांडे आणि रामलिंगा रेड्डी यांच्याशीही बोललं आहे.
हेही वाचा: 'काश्मिरी पंडितांच्या दुकानांना केजरीवाल सरकार देणार मोफत वीज कनेक्शन'
सीएम इब्राहिम म्हणतात, 'काँग्रेसकडून आश्वासन मिळाल्यानंतरच आम्ही रेड्डींना निवडणुकीत उतरवलं होतं. JD(S) कडं 32 मतं आहेत. कर्नाटक विधानसभेतील उमेदवाराला विजयासाठी 45 मतांची आवश्यकता आहे. तर, दुसरीकडं काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडं केवळ 18 मतं आहेत. त्या दृष्टीनं काँग्रेसनं आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे.'
Web Title: Jds Hd Deve Gowda Has Sought Support From Sonia Gandhi Of Congress For The Rajya Sabha Election Karnataka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..