esakal | मोठी बातमी! JEE, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
sakal

बोलून बातमी शोधा

students

कोरोनामुळे जेईई अॅडवान्स परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जेईई परीक्षा 3 जूनला होणार होत्या, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! JEE, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोनामुळे जेईई अॅडवान्स (JEE advanced) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जेईई अॅडवान्सची परीक्षा 3 जूलैला होणार होती, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली आहेत. जेईई मेन्सच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर, जेईई अॅडवान्सबाबत काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तसेच सीए अभ्यासक्रमाच्या (ca exam) परीक्षाही पुढे ढकलल्यात आल्या आहेत. आता सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा 5 जूलैपासून होणार आहेत. (JEE advanced ca exam postponed due to corona)

कोरोना महामारीचा प्रकोप सुरु असताना परीक्षा ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार का, याबाबत साशंकता होती. बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेलं नाहीय. याशिवाय जेईई अॅडवान्स परीक्षा पुढे ढकलल्या जाव्या अशी मागणी अनेकांकडून होत होती. अखेर सरकारने 3 जूलैला होणाऱ्या परीक्षा पुढ्यावर टाकल्या आहेत. देशात कोरोनाचा प्रकोप सुरु असून जून महिन्यात विषाणू पीक गाठण्याची शक्यता आहे. अशाच विद्यार्थी-पालक आणि शैक्षणिक संस्थांवर दबाव आहे.

हेही वाचा: "मोदी सरकारने उत्तर कोरियालाही टाकलं मागे"

देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. अनेक राज्यातील विद्यार्थांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आलं आहे. तर काही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीद्वारा (एनटीए) मे महिन्याअखेर घेण्यात येणारी जेईई (जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम) परिक्षाही पुढे ढकलण्यात (JEE Exam postponed) आली. एप्रिलमधीलही परिक्षा रद्द करण्यात आल होती. एनटीएने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सुचना जारी केली. परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येतंय.