
JEE Main 2025 सत्र 2 चा निकाल राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने अधिकृतपणे जाहीर केला आहे. JEE अर्थात जॉइंट एंट्रन्स एग्झामिनेशन मध्ये सहभागी झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. उमेदवारांना आपले गुण आणि स्कोअरकार्ड पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्यावी लागेल.