JEPC Jobs: कनिष्ठ अभियंता, प्रोग्रामर पदांसाठी संधी; ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा; ६६ हजार रुपयांपर्यंत मानधन

EPC Recruitment 2026, Junior Engineer Jobs, Government Jobs: झारखंड शिक्षण प्रकल्प परिषदेत १०६ कंत्राटी पदांसाठी भरती सुरू झाली आहे. कनिष्ठ अभियंता, साहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक, लेखा अधिकारी आणि संगणक प्रोग्रामर पदांसाठी पात्र उमेदवारांना ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. दरमहा ६६,२५१ रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे.
JEPC Recruitment 2026 offers 106 contractual vacancies, including Junior Engineer and Programmer posts, with monthly remuneration up to ₹66,251.

JEPC Recruitment 2026 offers 106 contractual vacancies, including Junior Engineer and Programmer posts, with monthly remuneration up to ₹66,251.

esakal

Updated on: 

झारखंड सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या झारखंड शिक्षण प्रकल्प परिषदेने (JEPC) राज्यातील विविध कार्यालयांमध्ये १०६ पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, साहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक, लेखा अधिकारी आणि साहाय्यक संगणक प्रोग्रामर यांसह विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा २६,९२३ ते ६६,२५१ रुपये मानधन दिले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com