जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी

जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी

नवी दिल्ली : खासगी एअरलाईन जेट एअरवेज आता पुन्हा एकदा उड्डाण करण्यास तयार झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या (NCLT) मुंबई बेंचने जेट एअरवेजसाठी कालरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालानच्या रिझॉल्यूशन प्लॅनला काही अटींसह मंजूरी दिली आहे. कालरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालानने जेट एअरवेजसाठी यशस्वी बोली लावली होती. रिझॉल्यूशन प्लॅन अंतर्गत NCLT ने डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हीएशन (DGCA) आणि एव्हीएशन मिनिस्ट्रीला कर्जामुळे अडचणीत आलेल्या जेट एअरवेजला स्लॉट अलॉट करण्यासाठई 90 दिवसांचा अवधी दिला आहे.

जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी
भूक लागलेला हत्ती पोहोचला थेट किचनमध्ये; VIDEO VIRAL

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजला देशाअंतर्गत आणि इंटरनॅशनल रुट देण्याबाबतची समस्या अद्याप तशीच आहे. कॅलरॉक-जालान कन्सोर्टीयमने पुढील पाच वर्षांमध्ये बँका, आर्थिक संस्था आणि कर्मचाऱ्यांना 1200 कोटी रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव ठेवला आहे. याच्या 30 विमानांसोबत जेट एअरवेजची फुल सर्व्हीस एअरलाईन म्हणून स्थापन करण्याची योजना आहे.

कालरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालानच्या बोलीला कमिटी ऑफ क्रेडिटर्सने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंजूरी दिली होती. या दोन्हींकडे एअरलाईन चालवण्याचा कसलाही अनुभव नाहीये. Kalrock Capital ही ब्रिटनची ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे तर मुरारी लाल जालान युएईचे उद्योजक आहेत. रिझॉल्यूशन प्लॅननुसार, यशस्वी बोलीकर्त्याने जेट एअरवेजच्या रिव्हायवलसाठी 1,375 कोटी रुपये पैसे गुंतवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये म्हटलं गेलंय की, एनसीएलटीची मंजूरी मिळाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत 30 एअरक्राफ्ट्ससोबत एअरलाईन पुन्हा एकदा कामकाज सुरु करेल.

जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी
माजी पंतप्रधान देवेगौडांना कोर्टाचा झटका; दोन कोटींचा भुर्दंड

कधी बंद पडली होती?

नरेल गोयल यांनी 25 वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. मोठं नुकसान झाल्याकारणाने जेट एअरवेज एप्रिल 2019 मध्ये बंद झाली होती. त्यावेळी कंपनीचे प्रमोटर नरेश गोयल यांना 500 कोटी रुपयांची गरज होती मात्र, ते तेवढी रक्कम जमवू शकले नाहीत. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च देखील त्यांना परवडू शकले नाहीत. जेट एअरवेज कंपनी बंद झाल्यानंतर त्यांचे जवळपास 17 हजार कर्मचारी रस्त्यावर आले होते. यानंतर जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या बँकांच्या कन्सोर्टीयमने नरेश गोयल यांना कंपनीच्या बोर्डावरुन हटवलं होतं. कंपनीला जून 2019 मध्ये रिझॉल्यूशन प्रोसेसमध्ये ठेवण्यात आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com