जेट एअरवेजचे नरेश गोयल ताब्यात; निवासस्थानी छापे

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 मार्च 2020

नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या "जेट एअरवेज'ला बॅंकांकडून तातडीने 1500 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

मुंबई : 'जेट एअरवेज'चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या "जेट एअरवेज'ला बॅंकांकडून तातडीने 1500 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. बॅंकांच्या अटी-शर्थींमुळे नाइलाजास्तव पायउतार व्हावे लागलेल्या गोयल यांची 25 वर्षांची अध्यक्षपदाची कारकीर्द संपुष्टात आली होती. 

बुधवारी रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील त्यांच्या बलार्ड इस्टेट ऑफिसमध्ये चौकशी केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. यानंतर त्यांना फेमा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. जेटकडून करण्यात आलेल्या 12 वर्षांतील आर्थिक करारांची चाचपणी करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jet ex-promoter Naresh Goyal detained by ED