Delhi Jewellery Shop Robbery: शोरूम फोडलं अन् २५ कोटींच्या दागिन्यांची केली चोरी, पण पोलिसांनी...

Delhi Jewellery Shop Robbery
Delhi Jewellery Shop Robbery
Updated on

दिल्लीतील दागिन्यांचे शोरूम फोडून २५ कोटींची चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी छत्तीसगढ येथून अटक केली आहे. या तिघांपैकी एक हा अट्टल चोर असल्याचे सांगितले जात असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चोरांकडून दागिने देखील जप्त केले आहेत.

दिल्लीत जंगपुरा येथे रविवारी एका दागिन्यांच्या शोरूममध्ये २५ कोटी रुपयांची चोरी झाली होती. हे शोरूम उमराव सिंह आणि महावीर प्रसाद जैन यांचं आहे. चोरांनी दुकानात ठेवलेले २० ते २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने पळवले होते. चोर दुकानाचे छत कापून शोरूमध्ये घुसले होते.

छत्तीसगढ पोलिसांनी दुर्ग येथून ७ चोऱ्या करणाऱ्या लोकेश श्रीवास याला स्मृतिनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अटक केली होती. त्याच्या जवळ दिल्ली शोरूममधून चोरी केलेल १८ किलो सोन आणि १२.५० लाख कॅश ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी लोकेशचा दुसरा साथिदार शिवा चंद्रवंशी याला कवर्धा येथून दागिन्यांसोबतच २८ लाखांचा ऐवजासोबत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपिंना अटक करून दिल्लीला घेऊन जात आहेत.

Delhi Jewellery Shop Robbery
Amazon-Flipkart Sale : अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे सेल एकाच दिवशी होणार सुरू; जाणून घ्या कोणत्या अन् किती असणार ऑफर्स?

शोरूमच्या मालकांने दिलेल्या माहितीनुसार हिरे आणि सोन्याचे २० ते २५ कोटींचे दागिने शोरूमध्ये ठेवण्यात आले होते. जंगपुरा येथील बाजार सोमवारी बंद असतो. त्यामुळे रविवारी शोरूम बंद केल्यानंतर जेव्हा मंगळवारी शोरूम उघडले तेव्हा त्यांचे डोळेच फिरले. त्यांनी सांगितलं की, शोरूममधील संपूर्ण दागिने गायब झाले होते. रिकामं शोरूम पाहून त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

जंगपुरा मार्केटमधील या बिल्डिंगमध्ये अनेक दुकाने आहेत. या शोरूमच्या बाजूला पायऱ्या आहेत, येतून दुकानात शिरण्यासाठी चोरांनी दुकानाचे छत कापले. या कापलेल्या छताचा देकील व्हिडीओ समोर आला आहे.

Delhi Jewellery Shop Robbery
Justin Trudeau : अखेर जस्टिन ट्रुडो नरमले! म्हणाले, 'भारत एक वाढती आर्थिक शक्ती, आम्ही घनिष्ठ संबंध ठेवण्यासाठी प्रतिबद्ध'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com