

उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका गरीब पतीला पत्नीच्या निधनानंतर मृतदेह घरी नेण्यासाठी पैसे नसल्याने चक्क रुग्णालय परिसरातील पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर मृतदेह ठेवून तासनतास पावसाच्या पाण्यात मदतीची वाट पाहत बसावे लागले.