
झांसी: पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलेल्या आणि दुसऱ्या पतीच्या मृत्यूनंतर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेला लग्नासाठी दबाव टाकणे महागात पडले. महिलेच्या हट्टामुळे त्रस्त झालेल्या लिव्ह-इन पार्टनरने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तिला संपवलं. अत्यंत क्रूरपणे झालेल्या खुनामुळे पुन्हा एकदा श्रद्धा वालकर केसची आठवण झाली आहे.