
रांची : झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यामध्ये १७ वर्षीय आदिवासी युवतीवर १० जणांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही युवती एका विवाहसोहळ्यासाठी नातेवाइकांच्या घरी गेली होती. ती लघुशंकेसाठी घराबाहेर गेली असता, एका व्यक्तीने तिला पकडले.