Jharkhand Accident | भीषण! गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकची धडक, 15 जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jharkhand Accident

भीषण! गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकची धडक, 15 जण ठार

Jharkhand Road Accident : झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तब्बल 15 जण ठार झाले असून या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

आम्रपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडेर कोला गावाजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस आणि ट्रकची थेट धडक झाली. ट्रक गॅस सिलिंडरने भरलेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिट्टीपारा-आम्रापाडा मुख्य रस्त्यावर पडेर कोलाजवळ एक खाजगी बस आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकची समोरा समोर धडक झाली. अनियंत्रित ट्रक बसवर जोरात आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मृतांमध्ये बहुतांश जण हे बसमध्ये प्रवास करत होते. मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली.

या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त प्रवाशांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

ही बस साहिबगंजहून दुमकाकडे जात होती. पाकूरचे एसपी एचपी जनार्दन यांनी सांगितले की, आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमधील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. बसमधून बरेच लोक रस्त्यावर पडले किंवा जखमी झाले, तर बरेच लोक आत अडकले. जखमी आणि मृतांना बसमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

हेही वाचा: महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर 2.5 लाखांची सूट; पाहा डिटेल्स

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jharkhand
loading image
go to top