

Jharkhand’s health department has launched an anti-tobacco awareness campaign and counselling initiative near selected Durga Puja pandals to help people quit addiction.
esakal
शारदीय नवरात्री आणि दुर्गापूजेच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या आरोग्य विभागाने राज्यभर व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तंबाखू, गुटखा, दारू आणि धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रमुख दुर्गापूजा मंडप, चौक आणि रस्त्यांवर ५ हजारांहून अधिक बॅनर्स व होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. व्यसन सोडू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी काही प्रमुख पूजा मंडपांजवळ समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.