

World Children's Day: Young Journalists Raise Their Voice for Child Rights
esakal
रांची : जागतिक बाल दिनानिमित्त यूनिसेफच्या १० बाल पत्रकारांनी शुक्रवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची रांची येथील मुख्यमंत्री निवास कार्यालयात भेट घेतली. या वेळी शिक्षण, आरोग्य, बालविवाह, बालमजुरी, हवामान बदल आणि बालहक्क अशा विविध विषयांवर मुलांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. मुलांचा आत्मविश्वास आणि सामाजिक प्रश्नांविषयीची जाणीव पाहून सोरेन यांनी त्यांचे कौतुक केले.
"जेव्हा एखादे मूल अन्यायाविरुद्ध आवाज उठवते किंवा समाजातील समस्यांवर उपाय सुचवते, तेव्हा त्याचा आवाज ऐकला गेलाच पाहिजे," असे मुख्यमंत्री म्हणाले. मुलांना केवळ योजनांचे लाभार्थी न मानता त्यांच्या आयुष्याशी संबंधित निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे महत्त्वाचे असल्याचेही या संवादातून अधोरेखित झाले.