Jharkhand Government Jobs : झारखंडमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या १,०३८ जागांसाठी भरती; दरमहा २५ हजार रुपये मानधन

Jharkhand CHO Recruitment 2026 : झारखंड ग्रामीण आरोग्य मिशन सोसायटीने कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या १,०३८ बॅकलॉग पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये मानधन मिळणार असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
Jharkhand CHO Recruitment 2026

Jharkhand CHO Recruitment 2026

sakal

Updated on: 

झारखंड : झारखंड ग्रामीण आरोग्य मिशन सोसायटीने (JRHMS) कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदांच्या १,०३८ बॅकलॉग जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. ही नियुक्ती एका वर्षाच्या कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

पदे आणि मानधन

या भरतीअंतर्गत कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या एकूण १,०३८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही सर्व पदे बॅकलॉग स्वरूपातील असून, निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती एक वर्षासाठी कंत्राटी तत्त्वावर केली जाईल. या पदासाठी दरमहा २५ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...