माणुसकीला काळिमा! भावानं केला दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार

Jharkhand Crime News
Jharkhand Crime Newsesakal
Summary

लोहरदगा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आलीय.

झारखंडमधील (Jharkhand) लोहरदगा जिल्ह्यातून (Lohardaga District) माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आलीय. आपल्या सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. ही लाजिरवाणी घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू आझाद बस्ती येथील आहे. या तरुणाच्या आईनं बुधवारी लोहरदगा येथील महिला पोलिस ठाण्यात (Lohardaga Women Police Station) तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीय.

महिला स्टेशन प्रभारी जोस्फिना हेम्ब्रम यांनी सांगितलं की, पीडितेच्या आईकडून मिळालेल्या तक्रारीनुसार तरुणानं आपल्या मोठ्या बहिणीवर घरामध्ये जबरदस्तीनं बलात्कार केला. मोठ्या बहिणीचा रडण्याचा आवाज ऐकून धाकटी बहीण खोलीत पोहोचली, तेव्हा तरुणानं चाकूचा धाक दाखवून तिला गप्प केलं. यावेळी तरुणानं लहान बहिणीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलींना वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही या नराधम मुलानं बलात्काराचा प्रयत्न केला. या घटनेनंतर अल्पवयीन बहिणीनं खुलासा केलाय की, 'आरोपी गेल्या ३-४ वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत होता.'

Jharkhand Crime News
Punjab : पंजाबचे मुख्यमंत्री, राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी

या संपूर्ण प्रकरणात आरोपी तरुणाविरुद्ध भादवी कलम 376, 354, 506 आणि 6 पोक्सो कायद्यानुसार महिला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/22 नुसार एफआयआर दाखल करण्यात आलाय. यासोबतच आईच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केल्यानंतर तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com