Crop Relief Scheme: पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना एकरी ४ हजारांची भरपाई, जाणून घ्या योजनेचे निकष

Jharkhand State Crop Assistance Scheme: ना विमा, ना प्रीमियम; नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास थेट सरकारी मदत, पीक मदत योजनेची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Jharkhand Crop Relief Scheme

Jharkhand Crop Relief Scheme

esakal

Updated on

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास झारखंड सरकारच्या झारखंड राज्य पीक मदत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना कोणताही विमा काढण्याची किंवा प्रीमियम भरण्याची गरज नाही. पीक नुकसानीच्या प्रमाणानुसार सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाते.

नुकसानीनुसार मिळते भरपाई

पिकांचे ३० ते ५० टक्के नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिएकर ३ हजार रुपयांची मदत मिळते. ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास प्रतिएकर ४ हजार रुपयांची मदत दिली जाते. जास्तीत जास्त पाच एकर क्षेत्रासाठी ही मदत मिळू शकते.

खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील पिकांना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. भात, मका, गहू, मोहरी, हरभरा आणि बटाटा यांसारख्या पिकांना याचा लाभ मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com