Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

Jharkhand cancer care upgrade : जिल्हा रुग्णालयांत डे-केअर कॅन्सर सेंटर, केमोथेरपी व आधुनिक रेडिएशन सुविधा; रांचीतील सेंट्रल कमांड सेंटरमधून राज्यभरातील सेवांवर देखरेख
Jharkhand cancer care upgrade

Jharkhand cancer care upgrade

sakal

Updated on

झारखंड : झारखंडमधील कॅन्सर रुग्णांना उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये किंवा परराज्यात जावे लागू नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘डे-केअर कॅन्सर सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर रांची, जमशेदपूर, धनबाद, दुमका, हजारीबाग आणि पलामू या सहा ठिकाणी आधुनिक रेडिएशन सेंटर उभारण्याची योजना आहे.

आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अजय कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील कॅन्सर उपचारांच्या सुविधांचा विस्तार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला विशेष सचिव डॉ. नेहा अरोरा, आरोग्य सोसायटीचे कार्यकारी संचालक शशी प्रकाश सिंह तसेच रिम्स, एसएनएमएमसीएच आणि मेदांता रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com