Jharkhand : झारखंडच्या विकासासाठी १,६५० प्रकल्पांचा शुभारंभ; २०५० पर्यंत देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट

Jharkhand Development Vision 2050 : झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त रांची येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नऊ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करत राज्याला आघाडीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
Jharkhand Development Vision 2050

Jharkhand Development Vision 2050

esakal

Updated on: 

झारखंड : झारखंडच्या २६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पंधरवड्याच्या सोहळ्याचा समारोप आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी (२८ नोव्हेंबर २०२६) रांचीतील खेलगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ९ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या १,६५० विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. २०५० पर्यंत झारखंडला देशातील आघाडीच्या राज्यांच्या रांगेत उभे करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अर्थमंत्री राधाकृष्ण किशोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories