

jharkhand tourism survey
esakal
झारखंड: मधील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटनाच्या दृष्टीने अद्याप पुरेशी ओळख न मिळालेली ठिकाणे पर्यटकांसमोर आणण्यासाठी राज्यात इको-टुरिझमच्या दृष्टीने सर्वेक्षण आणि मॅपिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत जंगलं, डोंगर, धबधबे आणि इतर नैसर्गिक स्थळांची माहिती संकलित करून त्यांचा अधिकृत डेटाबेस तयार करण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरणाचे संरक्षण करत पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.