

IFFI 2026 Jharkhand Film Policy Discussed as Pankaj Jha and Cinema Industry Personalities Visit the Pavilion in Goa
esakal
गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) झारखंड फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (JFDCL) उभारलेल्या 'झारखंड पॅव्हेलियन'ला चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे चित्रपट धोरण, अनुदान योजना आणि निसर्गरम्य चित्रीकरण स्थळांची माहिती या माध्यमातून देशभरातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांपर्यंत पोहोचवली जात आहे.