

Jharkhand Flying Institute Plans to Provide Apple iPads to Eligible Pilot Trainees
esakal
झारखंडमध्ये व्यावसायिक वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या प्रशिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. दुमका विमानतळावर कार्यरत असलेल्या ‘सोना सोबरन उड्डाण अकॅडमी’ अर्थात झारखंड फ्लाईंग इन्स्टिट्यूटमधील पात्र प्रशिक्षणार्थींना विशेष किट बॅगसह ११ इंचांचा ॲपल आयपॅड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या डिजिटल साधनामुळे वैमानिक प्रशिक्षणातील तांत्रिक विषय, फ्लाइट नेव्हिगेशन, हवामानाची माहिती आणि विमानांच्या उड्डाणाशी संबंधित चार्ट्सचा अभ्यास करणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.