

Jharkhand government approves a 3% dearness allowance hike for state employees and pensioners.
esakal
झारखंड: झारखंडमधील राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्यात (DA) ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्के झाला आहे. ही वाढ १ जुलै २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. या बैठकीत एकूण ४१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.