Jharkhand News: झारखंडच्या १.७५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सॅलरी पॅकेज; अपघाती विम्यापासून एअर अ‍ॅम्बुलन्सपर्यंत सुविधा

Jharkhand Government Employees Salary Package : झारखंडमधील १.७५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष सॅलरी पॅकेजचा लाभ मिळणार आहे. अपघाती विमा, एअर अ‍ॅम्बुलन्स, अपंगत्व संरक्षण आणि सवलतीच्या व्याजदरात गृह व वाहन कर्जासह विविध बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
Jharkhand CM Hemant Soren During the Special Salary Package Agreement with Union Bank of India

Jharkhand CM Hemant Soren During the Special Salary Package Agreement with Union Bank of India

esakal

Updated on: 

झारखंड : झारखंडमधील सुमारे १.७५ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष सॅलरी पॅकेजचा लाभ मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाने युनियन बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या पॅकेजअंतर्गत कर्मचाऱ्यांना अपघाती विमा संरक्षण, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत, आपत्कालीन एअर अ‍ॅम्बुलन्स, सवलतीच्या व्याजदरात गृह आणि वाहन कर्जासह विविध बँकिंग सुविधा मिळणार आहेत.

या कराराचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देण्याबरोबरच आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वेतन खाते असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या विशेष पॅकेजचा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...