

Jharkhand Crop Guard Recruitment 2026
sakal
झारखंड : झारखंड सरकारच्या कृषी विभागाने रांची जिल्ह्यातील वनस्पती संरक्षण केंद्रांवर ‘पीक रक्षक’ (फसल रक्षक) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २१ जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याबरोबरच उमेदवाराला सायकल चालवता येणे आणि झाडावर चढता येणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ११ हजार ८५१ रुपये मानधन दिले जाणार आहे.
ही नियुक्ती ११ महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्त्वावर करण्यात येणार आहे. रांची जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.