esakal | झारखंडमध्ये लशींची सर्वाधिक नासाडी; केरळ, बंगालमध्ये प्रमाण कमी
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

झारखंडमध्ये लशींची सर्वाधिक नासाडी; केरळ, बंगालमध्ये प्रमाण कमी

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - सध्या देशभर निर्माण झालेल्या कोरोनाप्रतिबंधक लशींच्या (Corona Vaccine) टंचाईमुळे वाया जाणाऱ्या लशींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केंद्र सरकारने (Central Government) सूचना दिल्यानंतर देखील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लशींचे डोस वाया (Dose Wastage) जात असल्याचे दिसून आले आहे. (Jharkhand has the Wastage Highest Number of Vaccines Low in Kerala Bengal)

अन्य राज्यांशी तुलना करता केरळ आणि पश्‍चिम बंगालमध्ये लशींचे डोस वाया जात नसल्याचे दिसून आले झारखंडमध्ये मात्र सर्वाधिक लशी वाया जात आहेत.

असा झाला पूर्ण वापर

सर्वसाधारणपणे एका कुपीत १० डोस देण्यासाठी ५ मिलिलिटर एवढे द्रव भरलेले असते. सिरींज व कुपीला चिकटून ही मात्रा वाया जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या कुपीत ५ ऐवजी ६.२ मिलिलिटर एवढे द्रव भरण्यात येते. केरळ आणि प. बंगाल या राज्यांनी त्याचा देखील पुरेपूर वापर केल्याचे दिसून आले आहे. यामुळे येथे लशी वाया जाण्याचे प्रमाण अल्प आहे.

  • ७९०.६ लाख मेमध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या लशी

  • ६१०.६ लाख लसीकरणासाठी लशींचा वापर

  • ६५८.६ प्रत्यक्ष लसीकरणासाठी वापरलेले डोस

  • २१२.७ लाख सध्या शिल्लक असलेले डोस