Hemant Soren Cabinet Expansion Latest Update : विधानसभा निवडणुकीनंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी राज्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, त्यावेळी केवळ हेमंत सोरेन यांनीच शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना आज अखेर हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे.