Jharkhand Health News : झारखंडमध्ये किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरणाची तयारी; मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्वेक्षणानंतरच निर्णय घेण्याचे दिले निर्देश

HPV Vaccination in Jharkhand : झारखंडमध्ये किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी HPV लसीकरणाचा विचार सुरू आहे. मात्र, लसीकरणापूर्वी राज्यभर सर्वेक्षण करून सुरक्षितता आणि परिणामकारकतेचा अभ्यास केला जाणार आहे.
HPV Vaccination in Jharkhand

HPV Vaccination in Jharkhand

sakal

Updated on: 

रांची (झारखंड) : झारखंडमधील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरणावर विशेष चर्चा झाली. मात्र, लसीकरण सुरू करण्यापूर्वी राज्यभर सर्वेक्षण करून वैद्यकीय आणि वैज्ञानिक बाबींचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, झारखंडमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे १३ रुग्ण आढळत असल्याची नोंद आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आजाराचे प्रमाण, रुग्णांचे वयोगट आणि आजाराच्या विविध टप्प्यांची माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच देश-विदेशातील कर्करोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून HPV लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्याचे निर्देश देण्यात आले.

Loading content, please wait...