Health News Jharkhand
sakal
झारखंड: असंसर्गजन्य रोगांच्या (NCD) प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी झारखंडच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या ‘इंटिग्रेटेड NCD मॉडेल’ला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या मॉडेलची झारखंडमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्याच्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर देशातील इतर राज्यांमध्येही हा आराखडा लागू करण्याची तयारी आहे.