Jharkhand Minister Hafizul Hasan inaugurates the free coaching scheme for minority students in Ranchi.
esakal
झारखंड: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी झारखंड सरकारने 'मुख्यमंत्री अल्पसंख्याक कोचिंग योजना' सुरू केली आहे. अल्पसंख्याक कल्याण आणि जलसंपदा मंत्री हफीजुल हसन यांच्या हस्ते रांची येथील कडरू हज हाऊसमध्ये या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शासकीय अधिकारी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.