

Mission Vatsalya Scheme
sakal
रांची (झारखंड) : अनाथ, निराधार आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी झारखंड सरकारने ‘मिशन वात्सल्य’ प्रायोजन योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेत पात्र बालकांना दरमहा ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. मुलांचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत ही मदत मिळू शकते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त तीन मुलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
बाल विकास आणि सामाजिक सुरक्षा विभागामार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने ही योजना राबवली जात आहे. आर्थिक अडचणींमुळे मुलांचे शिक्षण किंवा पालनपोषण थांबू नये, हा या योजनेचा उद्देश आहे.