

Hemant Soren inaugurates the Jharkhand Pavilion at Bharat Mandapam
esakal
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (IITF) झारखंड पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हस्ते करण्यात आले. ८०० चौरस फूट क्षेत्रफळात उभारण्यात आलेल्या या पॅव्हेलियनमध्ये राज्यातील विविध शासकीय विभाग आणि संस्थांचे एकूण २२ स्टॉल्स आहेत. या माध्यमातून झारखंडची पारंपरिक कला, हस्तकला, चित्रकला, खादी वस्त्रे आणि स्थानिक उत्पादने देश-विदेशातील व्यापारी व खरेदीदारांसमोर मांडण्यात आली आहेत.