

A centralized blood supply system is planned in Jharkhand to improve emergency blood availability.
sakal
रांची : आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची कमतरता आणि वेळेवर रक्त उपलब्ध न होण्याची समस्या दूर करण्यासाठी झारखंड सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरोग्य विभाग आणि ‘एम सायन्स’ (M Science) यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्यात रक्तपुरवठ्यासाठी केंद्रीकृत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या व्यवस्थेत रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना केवळ टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा लागणार असून, मागणी नोंदवल्यानंतर जास्तीत जास्त चार तासांत आवश्यक रक्त संबंधित रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.