

Jharkhand Opens Online Registration for the SEHIS Health Insurance Scheme for Eligible Employees and Pensioners
esakal
झारखंड ; राज्य आरोग्य सोसायटीने राज्यातील पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ‘स्टेट एम्प्लॉईज हेल्थ इन्शुरन्स स्कीम’ (SEHIS) अंतर्गत ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू केले आहे. या योजनेत मंडळे व महामंडळांमधील कर्मचारी, विद्यापीठांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा समावेश आहे. ‘बी’ श्रेणीतील पात्र लाभार्थ्यांना १ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.