Jharkhand Thalassemia : थॅलेसेमिया अन् सिकल सेल रुग्णांना मोठा दिलासा; खाजगी रुग्णालयांतही मोफत रक्त चढवण्याची सोय

Free Blood Transfusion Facility Extended to Private Hospitals : झारखंडमध्ये आयुष्मान भारत आणि अबुआ स्वास्थ्य कार्डधारकांना पॅनेलवरील खासगी रुग्णालयांतही मोफत रक्त संक्रमणाची सुविधा मिळणार आहे.
Jharkhand Thalassemia

Jharkhand Thalassemia

esakal

Updated on

थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया आणि तीव्र ॲनिमियाच्या रुग्णांसाठी झारखंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आयुष्मान भारत आणि अबुआ स्वास्थ्य कार्डधारकांना शासकीय रुग्णालयांप्रमाणेच पॅनेलवरील खासगी रुग्णालयांमध्येही मोफत रक्त संक्रमणाची सुविधा मिळणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या उपचारांच्या पॅकेजचे दर निश्चित केले आहेत.

थॅलेसेमिया आणि सिकल सेलच्या रुग्णांना ठराविक अंतराने रक्त चढवावे लागते. त्यामुळे उपचारांसाठी वारंवार मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये जावे लागते. आता पॅनेलवरील खासगी रुग्णालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची धावपळ कमी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com