
जमशेदपूर : मासे खाण्याप्रमाणे मासे पकडण्याचं वेड अनेकांना असतं. मात्र हेच वेड झारखंड येथील एका महिलेच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. मासेमारी करत असतानाच एक मासा थेट घशात अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर महिलेला श्वास घेण्यास त्रास झाल्याने तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पीडित महिलेला दीड तासानंतर रुग्णालयात नेले असून यादरम्यान महिलेची प्रकिया बिकट झाली होती दरम्यान या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.