बच्चन यांचे बॉडीगार्ड राहिलेले जितेंद्र शिंदे पोलिस दलातून निलंबित; 'हे' ठरलं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बच्चन यांचे बॉडीगार्ड राहिलेले जितेंद्र शिंदे पोलिस दलातून निलंबित

बच्चन यांचे बॉडीगार्ड राहिलेले जितेंद्र शिंदे पोलिस दलातून निलंबित

मुंबई: अमिताभ बच्चन यांचे माजी अंगरक्षक जितेद्र शिंदे पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. जितेंद्र शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी यांचे ते बॉडीगार्ड होते. त्यांच्यावर असे आरोप होते की, त्यांनी आपल्या पत्नीच्या नावावर सिक्यूरिटी एजन्सी उघडली होती. यासाठी अमिताभ बच्चन आणि परदेशातून मोठी रक्कम आली होती. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांची चौकशी सुरु झाली होती.

हेही वाचा: Taliban: भारताला डिवचण्यासाठी लष्करी तुकडीला दिले 'पानिपत' नाव

त्या चौकशीतून असं निष्पन्न झालंय की, जितेंद्र शिंदे हे रितसर अर्ज करुन वा आपल्या वरिष्ठांना न देता चार ते पाच वेळा दुबई आणि सिंगापोरला गेले आहेत. तसेच त्यांनी सुट्टीवर बाहेर जाताना खोटी माहिती दिली आहे. या चौकशीमध्ये त्यांना दोषी ठरवून निलंबित करण्यात आलं आहे.

यामध्ये त्यांच्या पत्नीच्या सिक्यूरटी एजन्सीबाबतही चौकशी केली जात आहे. काही दिवसांपर्वीच त्यांच्यावर खाते अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश होते. त्यांच्या पत्नीच्या नावे सिक्यूरिटी एजन्सी होती. या सिक्यूरिटी कंपनीत परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचा आरोप त्यांच्यावर होता. परदेशी दौरा शासकिय परवानगी न घेता केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळेच जितेंद्र शिंदे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Web Title: Jitendra Shinde Amitabh Bachchan Bodyguard Has Been Suspended From The Police Force

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :(Amitabh bachchan)
go to top